श्रीमंतांची मौज होते आणि सामान्यांचा जीव जातो… कोरियन वेबमालिका ‘स्क्विड गेम’ पाहताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. ‘स्क्विड गेम’चे पहिले पर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर दुसरे पर्व नेटफ्लिक्सवर नुकतेच प्रदर्शित झाले. पहिल्याच पर्वात अमाप अपेक्षा उंचावलेल्या प्रेक्षकांना दुसऱ्या पर्वात मात्र फारसं काही नवीन सापडलेलं नाही.

कोरियाने युद्धानंतर अनेक आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरे पाहिली आहेत. युद्धझळ बसलेली कुटुंबं, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, गरिबी, बेरोजगारी आणि या सगळ्याच्या कचाट्यात सापडलेला देश याचे प्रतिबिंब तिथल्या सिनेमात प्रकर्षाने उमटते. सामाजिक उतरंड, गरीब-श्रीमंतांमधली खोल दरी आणि त्यातून आलेली माणसांची अगतिकता, तरीही परिस्थितीशी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यांचे चित्रण केलेले कोरियन सिनेमे, वेबमालिका प्रेक्षकांवर गारुड करतात. ‘पॅरासाइट’ हा सिनेमाही अशाच सामाजिक दरीवर आधारलेला होता. त्यानंतर दोन वर्षांनी करोनाच्या लाटेतून वाट काढत ‘स्क्विड गेम’ ही वेबमालिका नेटफ्लिक्सवर आली आणि प्रेक्षकांनी तिला अक्षरश: डोक्यावर घेतले. ती सर्वाधिक पाहिली गेलेली वेबमालिका ठरली.

Marathi Movie Review M Po Bombilwadi Director Paresh Mokashi
रंगतदार प्रहसननाट्य
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Loksatta natyarang The story of the gradual fading of memory of dementia sufferers
नाट्यरंग: असेन मी नसेन मी: स्मृतिभ्रंशग्रस्तांची हळूहळू विझण्याची कहाणी…
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!

हेही वाचा >>>बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पणवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”

युद्धानंतर गेल्या सहा-सात दशकांत दक्षिण कोरियात औद्याोगिकीकरणाचा वेग वाढला. हुकमशहा सत्तेत आले. विकासाची फळे सर्वदूर पोहोचली नाहीत, त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत गेली. आत्महत्यांचे प्रमाण वाढले, लोक कर्जात बुडून नैराश्यात जाऊ लागले. हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे पैशांची खरी किंमत काय हे तेथील या वर्गापेक्षा अधिक कोणाला ठाऊक नसावं आणि म्हणूनच ज्यांच्या हाती अमाप पैसा असे मूठभर विरुद्ध हा गरीब, पिचलेला वर्ग हा संघर्ष अत्यंत परिणामकारक पद्धतीने या मालिकेत येतो. गरिबांना कर्जमुक्तीचे आमिष दाखवत लहान मुलांचे खेळ खेळवून त्यात हरणाऱ्यांना जिवानीशी मारून मजा लुटणारा श्रीमंत वर्ग ही संकल्पनाच पहिल्या पर्वासाठी अनोखी होती, त्यामुळे प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली. पण पहिलं पर्व तुफान लोकप्रिय ठरल्यानंतर दुसऱ्या पर्वात ती लोकप्रियता कायम ठेवण्याचं आव्हान निर्मात्यांपुढे होतं. उत्कंठा टिकवून ठेवण्यासाठी लागणारं नावीन्य दुसऱ्या पर्वात मात्र हरवलेलं दिसतं. पहिल्या पर्वात सेओंग गि हून हा नायक (अभिनेता ली जंग जे) हा जीवघेणा खेळ जिंकतो, त्यानंतर तीन वर्षांनंतरचं कथानक दुसऱ्या पर्वात आहे. गि हून पुन्हा या खेळात प्रवेश करतो, पण यावेळी तो खेळाच्या आयोजकांचा बीमोड करण्याच्या उद्देशाने आलेला असतो. सात भागांच्या दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांची दर एक भागात उत्कंठा कायम असली तरी पहिले पर्व पाहिलेल्यांसाठी नावीन्य संपलेलं आहे. त्यामुळे पहिल्या पर्वाच्या पराकोटीच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाकडून त्याच पटीत अपेक्षा वाढवून ठेवलेल्या प्रेक्षकांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे. दुसऱ्या पर्वात पुन्हा खेळ सुरू झाल्याने उत्कंठा कायम ठेवण्यात निर्माते, दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युकची झालेली दमछाक दिसून येते. समाजातल्या भेदाभेदांना अधिक धार चढविण्यासाठी यात समलिंगी पात्र आणले आहे. शिवाय, दुसरे पर्व अधिक रक्तरंजित आहे. मात्र पैशांची निकड आणि हाव, जगण्याची आणि मृत्यूचीही भीती, उमेद, आकांक्षांचे चढउतार प्रभावीपणे मांडण्यात दुसरे पर्वही यशस्वी ठरले.

Story img Loader