Jayasurya Responds To Sexual Misconduct Allegations : अभिनेता जयसूर्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. हेमा समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर जयसूर्याने त्याच्या महिला सहकलाकारांबरोबर अयोग्य वर्तन केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणातील अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने जयसूर्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींना प्रतिसाद म्हणून सध्या अमेरिकेत असलेल्या जयसूर्याने या प्रकरणातील बाजू स्पष्ट करणारे एक निवेदन जारी केले. “आज माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सर्वांना, तुमचा पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार”, असं ३१ ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.

या ‘खोट्या आरोपांमुळे’ त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना मानसिक त्रास झाल्याचं तो म्हणाला. निवदेनात त्याने म्हटलंय की, “माझ्या कर्तव्यामुळे, माझे कुटुंब आणि मी गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत होतो आणि या काळात माझ्यावर लैंगिक छळाचे दोन खोटे आरोप करण्यात आले. अगदी साहजिकच यामुळे मी, माझे कुटुंबीय आणि माझे प्रियजन हादरून गेलो आहोत.”

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki Tamboli
निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh praised Pandharinath Kamble
Video: “तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला, “अंगाला तेल लावून…”
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh have a wakeup call to all the Contested through a song
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘हे’ गाणं लावून सर्व सदस्यांना केलं जागं, म्हणाला…
Bigg Boss Marathi 5
Video: “त्यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत स्वार्थ…”, धनंजय आणि अंकिताबद्दल पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “घराच्या बाहेर गेल्यानंतर…”
Bigg Boss Marathi Season 5 Vishakha Subhedar Share old memories of pandharinath kamble
“आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा, म्हणाली, “हा माणूस…”
nikki tamboli mother takes arbaz patel side
Video: “काय केलंय त्याने?”, निक्कीच्या आईने घेतली अरबाज पटेलची बाजू; म्हणाल्या, “तो कितीही आक्रमकपणा…”
randeep hooda took lalbaughcha raja darshan
Video: रणदीप हुड्डाने VIP रांगेतून नाही, तर सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा >> “बेडरूममध्ये बोलावून स्पर्श करू लागला अन्…”, मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप, KCAच्या अध्यक्ष पदाचा द्यावा लागला राजीनामा

असत्य नेहमीच सत्यापेक्षा वेगाने प्रवास करतं

तसंच, या प्रकरणी तो कायदेशीररित्या समोरे जाणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. “मी कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी कायदेशीर टीम या प्रकरणातील उर्वरित कार्यवाही पाहणार आहे. सद्सद्विवेकबुद्धी नसलेल्या व्यक्तीला खोटे आरोप करणे सोपे असते. मला फक्त आशा आहे की एखाद्याला हे लक्षात येईल की छळवणुकीच्या खोट्या आरोपाचा सामना करणे हे छळवणुकीप्रमाणेच वेदनादायक आहे. असत्य नेहमीच सत्यापेक्षा वेगाने प्रवास करतं. पण मला विश्वास आहे की सत्याचा विजय होईल.”

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास

जयसूर्याने भारतात परतण्याची अचूक तारीख सांगितली नसली तरी, त्याने सांगितले, “इथलं माझं काम पूर्ण होताच मी परत येणार आहे. माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व कायदेशीर कार्यवाही सुरू राहील. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हा वाढदिवस सर्वात वेदनादायी बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे आभार.”

जयसूर्या व्यतिरिक्त प्रख्यात अभिनेते मुकेश, एडावेला बाबू, मनियानपिल्लई राजू आणि चित्रपट निर्माते रंजित यांच्यावरही अनेक अभिनेत्रींनी लैंगिक वर्तनाचे आरोप केले आहेत. त्यामुळे असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (एएमएएमए) च्या कार्यकारी समितीतील सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.