बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजा आणि रियासदीनशी यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. खतीजा-रियासदीनचा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यानचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – VIDEO : जस्टिन बीबरच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था, गंभीर आजाराचा करतोय सामना, शो देखील केले रद्द

गायक यो यो हनी सिंगने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हनी सिंगने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ए आर रहमान यांच्या कुटुंबियांबरोबर पोझ देताना दिसत आहे. चेन्नईमध्ये १० जूनला हा रिसेप्शन सोहळा पार पडला असल्याची चर्चा आहे.

अभिनेत्री मनिषा कोईरालासुद्ध या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित होती. खतीजाने रिसेप्शन सोहळ्यासाठी पर्पल रंगाचा भरजरी ड्रेस परिधान केला होता. तिचा या संपूर्ण ड्रेसवर आकर्षक वर्क देखील होतं. ड्रेसला मॅचिंगच मास्क खतीजाने लावला होता. त्याचबरोबरीने तिने परिधान केलेले दागिने विशेष लक्षवेधी होते.

आणखी वाचा – सुपरस्टार प्रभास लवकरच विवाहबंधनात अडकणार?, लग्नासाठी मुलगीही तयार पण मुहूर्त कधी?

तसेच खतीजाचा पती रियासदीनने काळ्या रंगाचा सुट परिधान केला होता. या रिसेप्शन सोहळ्यामध्ये नवविवाहित जोडप्याच्या लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. रियासदीन शेख हा ऑडिओ इंजिनिअर आहे. खतीजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे तसेच रिसेप्शनचे बरेच फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rahman daughter khatija reception in chennai photos and videos viral on social media kmd