गेले काही दिवस दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यंतरी त्यांनी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास यांच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा भाग होत असल्याचे जाहीर करत आनंद व्यक्त केला होता. गेली कित्येक वर्षं कमल हासन हे या क्षेत्रात सक्रिय असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकतंच संगीत सम्राट ए आर रेहमान यांनी कमल हासन यांच्याबद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतंच रेहमान आणि कमल हासन या दोन दिग्गजांनी मिळून लॉस एंजलीस येथील ऑस्कर म्युझियमला भेट दिली. यावेळी त्यांनी एकमेकांबरोबर चांगलाच वेळ घालवला, तसेच एकत्र हॉलिवूड क्लासिक ‘द गॉडफादर’ हा चित्रपटही त्यांनी एकत्र पाहिला. दरम्यान यावेळी रेहमान यांनी कमल हासन यांच्याबद्दल आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्याबद्दल भाष्य केलं.

Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
Aakriti Chopra
Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा, दोन वर्षांत पाच जणांनी सोडली कंपनी!

आणखी वाचा : “रणवीरची निवड योग्यच…” ‘डॉन ३’च्या घोषणेबद्दल अभिनेत्री ईशा कोपिकरचं वक्तव्य चर्चेत

याचवेळी रेहमान कमल हासन यांच्याबद्दल म्हणाले, “मला असं वाटतं की कमल हासन हे आपल्या चित्रपटसृष्टीत अडकून राहिले, जे एका अर्थी आपल्या पथ्यावरच पडलं. पण मला असं वाटतं की २० वर्षांपूर्वीच कमल यांनी हॉलिवूडमध्ये येऊन स्वतःचा एक चित्रपट करायला हवा होता. आजही कमल हासन नक्कीच तसं करू शकतात, त्यांनी यश अपयश याचा विचार न करता एक इंग्रजी चित्रपट करावाच अशी माझी इच्छा आहे. “

कमल हासन यांच्या १९९६ च्या ‘इंडियन’साठी रेहमान यांनी संगीत दिलं होतं. आता पुन्हा हे दोघे मणीरत्नम यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. कमल हासन यांचा ‘विक्रम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. आता त्यांच्या ‘इंडियन २’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.