उत्तर प्रदेशात सत्तेत असेलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त सैफई येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात ऑस्कर पुरस्कार विजेता ए आर रहमानच्या संगीताने होणार आहे.
ए आर रहमान हा आपल्या ३०० साथीदारांसह गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या ‘रणवीर सिंह स्मृति सैफई’ महोत्सवाचे अध्यक्ष धर्मेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार या महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमानच्या कार्यक्रमाने होणार आहे. आज संघ्याकाळी हा कार्यक्रम सादर होणार असून उद्या २२ सपाचे प्रमुखांचा वाढदिवस साजरा केला जाईल.

Story img Loader