भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान आज (६ जानेवारी ) ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडू मधील एका संगीतिय कुटुंबात त्याचा जन्म झाला. रहमानचे मूळ नाव ए.एस.दिलीपकुमार असे आहे.
ए. आर. रेहमानच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या चाली या कठीण असतात. त्या चाली मात्र ऐकायला खूप गोड वाटतात. गाणी ऐकताना त्यातून काही तरी अद्भूत गवसल्यासारखे वाटते. संगीतात आजच्या घडीला कोणीही त्याचा हात धरणारे नाही आहे, असे मानले जाते. १९९२ सालापासून त्याने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्याने संगीत दिलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानाला ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत. अशा या गुणी संगीतकाराला मानाचा मुजरा.
आपल्या आवडत्या रहमानला खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि त्यासोबतच तुम्हाला आवडलेले त्याचे गाणेही नमूद विसरु नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा