बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आणि स्टाईल दिवा करिना कपूर झिरो साइझमध्ये सर्वांनीच पाहिली आहे. पण, आता तिच्यासमोर एक नवे आव्हान समोर आले आहे. आगामी ‘शुद्धी’ चित्रपटासाठी तिला सिक्स पॅक अॅब्स बनवावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, झिरो साइजमध्ये चाहत्यांनी पाहिलेली करिना सिक्स पॅक अॅब्समध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी ती मार्शल आर्टचे धडे घेत असल्याची चर्चा आहे. करीनानेच बॉलिवूडमध्ये ‘झिरो फिगर’ची क्रेझ निर्माण केली होती. आता बेबो, सिक्स पॅक अँब्सचीही क्रेझ निर्माण करते का, हे बघणं रंजक ठरेल.
‘शुद्धी’मध्ये करिना आणि हृतिक यांची जोडी पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची असून करण मल्होत्रा याचे दिग्दर्शन करणार आहे. ‘शुद्धी’ पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader