राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालनच्या जाडेपणावर बहुतेकांकडून टीका केली जाते. नुकतेचं, विद्याने तिचे वजन आणि इतर गोष्टींवर होत असलेल्या टीकांमुळे काम करण्यास अधिक हुरहुरी येत असल्याचे म्हटले.
एका कार्यक्रमादरम्यान विद्या म्हणाली की, काही दिवसांपूर्वीच मी एका ज्येष्ठ अभिनेत्यास भेटले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘बहुत मोटी हो गयी है’. त्याचवेळी मला त्यांना उत्तर देण्याची इच्छा झाली की, ‘होर्मोनल प्रोब्लम आपको भी है’.  त्यांच्या कलागुणांचा मी आदर करते. पण माझ्याबद्दल असं काही बोलण्याचे धाडसचं त्यांना कसे झाले. कोणी कोणालाच असं कसं बोलू शकतं. मला अशा व्यक्तींवर हसू येते. सदर वर्तनाचा निषेध करत विद्याने त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगसारख्या वैयक्तिक विषयाबद्दलही लोक तिला गोडीने विचारतात असे म्हटले.’ अजून तुम्ही मुलाचा विचार नाही केलात’, असे मला लोक विचारतात. त्या लोकांना मला बोलावेसे वाटते की, ‘तुम्ही माझ्या घरी या. आपण यावर एकत्रितपणे चर्चा करू.’

Story img Loader