बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसल्याचे या पत्रात त्याने म्हटले आहे. तसेच, आपण आम आदमी पक्षाच्याही बाजूने नसल्याचे त्याने नमूद केले.
सामाजिक मोहिमांद्वारे आमिर आप पक्षाच्या बाजूने असणारे पोस्ट सध्या सोशल मिडियाद्वारे निदर्शनास येत आहे. काही आप कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी आमिरच्या छायाचित्रांचा वापर करत आहेत. ४९ वर्षीय अभिनेता आमिर आपल्या पक्षाला पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे. हे पाहता, आमिरने आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे सांगणारे पत्र निवडणूक आयोगाला लिहले.
“पहिल्या दिवसापासूनच आमिरने आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. तो कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचा प्रचारही करणार नाही.”, असे आमिरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा