गेल्या अनेक वर्षांपासून महिला वर्गात ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम १५ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी ‘होम मिनिस्टर’ निवडण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभ्रमंती देखील केली. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. लवकरच या कार्यक्रमाचे एक विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाच नाव ‘महामिनिस्टर’ असं आहे.
या पर्वात ‘महामिनिस्टर’च्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. विजेत्या वहिनींना मिळेल महामिनिस्टरचा खिताब आणि ११ लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी. ११ लाखाच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसेल. त्यामुळे सर्व वहिनी या नवीन पर्वासाठी आणि महामिनिस्टरचा खिताब जिंकण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. तर महामिनिस्टर हे पर्व ११ एप्रिल पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.