अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. सोहम बांदेकर हा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून छोट्या पड्यावर झळकतो. सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन तो चर्चेत आला आहे.
सोहमने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर त्यासोबत जिन्स परिधान केल्याचे दिसत आहे. तो या लूकमध्ये फारच छान दिसत आहे. या फोटोला सोहमने हटके कॅप्शन दिले आहे.
“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“जेव्हा मी शूटींग करत असतो, तेव्हा मला फार कमी वेळा सेमी फॉर्मल्स कपडे परिधान करण्याची संधी मिळते आणि जेव्हा ती मिळते तेव्हा मी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतो”, असे सोहमने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याचा हा सेमी फॉर्मल लूक चाहत्यांना भलताच आवडल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टला चांगलीच पसंती दिली आहे. अनेकजण यावर कमेंट करत तो खूप छान दिसत असल्याचे त्याला सांगत आहेत. तर अनेकांनी या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजीच्या मदतीने कमेंट केली आहे.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा
दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध नवे लक्ष्य मालिकेतून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळत आहे.