गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली ह्यआई कुठे काय करतेह्ण ही मालिका आता निरोप घेणार आहे. तर ‘आई-बाबा रिटायर होत आहेत…’ ही नवी मालिका सुरू होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मालिकांपैकी एक ‘आई कुठे काय करते’ मालिका आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अरुंधती ही व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील सर्व गृहिणींची लाडकी ठरली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ही भूमिका उत्तमरीत्या साकारली. मालिकेतील इतर भूमिकादेखील घराघरांत पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशीष या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. २ डिसेंबर रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
हेही वाचा >>>नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
अभिनेत्री मधुराणी म्हणाली, प्रेक्षकांनी अरुंधती या व्यक्तिरेखेवर आणि पर्यायाने माझ्यावर खूप प्रेम केलं. मालिकेच्या सहकलाकारांबरोबर निर्माण झालेला बंध आणि एक चांगली भूमिका निभावल्याचं समाधान चिरकाल लक्षात राहील. मालिका संपत असली करी अरुंधती माझ्याबरोबर कायम राहणार आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि अरुंधतीच्या आठवणी घेऊन इथून पुढची वाटचाल करणार आहे अशी भावना मधुराणी प्रभुलकर हिने व्यक्त केली.
महाराष्ट्राची लाडकी आईची मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी त्याच वेळी ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ ही रिटायर झालेल्या आई-बाबांची गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता मंगेश कदम या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिकासुद्धा अशीच प्रत्येकांच्या मनात घर करेल ही खात्री आहे. आई कुठे काय करते ही मालिका रसिकांच्या कायम मनात राहील याचा आनंद तर आहेच. मात्र निरोप देताना हळवं व्हायला होतंय, अशी भावना स्टार प्रवाहचे व्यवसायप्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.