छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमधील कलाकार मंडळींनी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीचा (Milind Gawali) तर एक वेगळाच चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मिलिंदचे इन्स्टाग्रामवर लाखोच्या घरात चाहते आहेत. मालिकेमध्ये कधी कठोर तर कधी नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणारा मिलिंद खऱ्या आयुष्यामध्ये फारच वेगळा आहे. त्याचं त्याच्या मुलीवर विशेष प्रेम आहे. त्याने आपल्या लेकीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद
मिलिंदने त्याची मुलगी मिथिला कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? आपल्याला तिचा का अभिमान आहे? याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. मिथिलाचा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, “फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचं मिथिलाने ठरवलं. या क्षेत्रामध्ये तिला काम करताना पाहून वडील म्हणून मला मिथिलाचा अभिमान वाटतो. जेव्हा तिने हे क्षेत्र निवडलं तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो होतो. ती तिच्या कामासाठी घेत असलेली मेहनत पाहून मी अजूनच थक्क झालो.”
पाहा व्हिडीओ
पुढे बोलताना मिलिंदने म्हटलं की, “नेहमी सकाळी मी जेव्हा तिची प्रगती, मेहनत आणि उत्साह पाहतो तेव्हा मला तिचा आणखी अभिमान वाटतो. मला माझ्या घरातूनच काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. माझ्या दोन पिढ्यांकडून मला प्रेरणा मिळते त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. एक पिढी म्हणजे माझे वडील श्रीराम गवळी. जे अजूनही माझ्यापेक्षा अधिक मेहनत घेतात. दुसरी पिढी म्हणजे माझी मुलगी मिथिला.”
मिलिंदला त्याची मुलगी ज्या क्षेत्रात काम करते ते पाहून फार आनंद होतो. मिलिंदच्या मुलीचा फिटनेस रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींनाही लाजवणारा आहे. मिलिंदने हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या लेकीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.