छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. तर मालिकेत आईची भूमिका साकारणारी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरचे लाखो चाहते आहेत. अरुंधती आता तिच्या आयुष्याच्या एका नव्या वळणारवर आहे असे म्हणायला हरकत नाही. अरुंधतीचा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. मात्र, नुकताच अरुंधतीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात अरुंधतीचा एक नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.
मधुराणीने तिचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. ‘आपण मनातून आनंदी असलो तर आपल्याला कोणत्याही फिल्टरची गरज नसते’, असे कॅप्शन मधुराणीने दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “तिला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण…”, सुकेश चंद्रशेखने केले जॅकलिनचे समर्थन
सध्या मालिकेत मधुराणी एका बाजूला नवी नोकरी सांभाळते. तर दुसरीकडे रेकॉर्डिंगचा अनुभव आणि म्युझिक स्कूलची पार्टनरशीप. अनिरुद्धकडून या सगळ्याला विरोध होत असताना अरुंधती तिच्या या छंदाला जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.