छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेले वेगवेगळे प्लॉट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. याच कारणामुळे या मालिकेचे आणि त्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत देशमुखांच्या घरात वादविवाद सुरु असल्याचे दिसत होते. आता देशमुखांच्या घरात कुठे करी आनंदाचे क्षण आल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये देशमुख कुटुंबात कांचन म्हणजेच आईंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु असल्याचे दिसते. यावेळी तिथे अरुंधती देखील उपस्थित असते. तर अनिरुद्ध अरुंधतीचे आभार मानत असल्याचे दिसत आहे. तुझ्यामुळे आज घरात आनंदाच वातावरण आहे असे म्हणतं अनिरुद्ध अरुंधतीचे आभार मानतो. शिवाय फॅमिली फोटो काढत असताना अनिरुद्ध संजनाला बोलावण्या ऐवजी अरुंधतीला फोटोमध्ये येण्यास सांगतो.

आणखी वाचा : ब्रेस्ट इम्प्लांटची थट्टा केल्याने करणवीर बोहरावर संतापली सायशा शिंदे, पाहा काय घडले…

आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…

मालिकेतील अनिरुद्ध काहीसा बदललेला दिसून येत आहे. अरुंधतीला निस्वार्थपणे आपल्या आईबाबांसाठी, मुलांसाठी, घरासाठी लढताना पाहून त्याच्यात काहीतरी फरक जाणवत आहे. आता अरुंधतीबद्दल त्याच्या मनात पुन्हा काही भावना निर्माण होताना दिसून येत आहेत. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हा भाग पाहायला मिळाला. त्यामुळे मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.