छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी (Milind Gawali) साकारताना दिसतात. या भूमिकेमुळे मिलिंद यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिलिंदने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “Great Bhet, काल ‘आई कुठे काय करते’ च्या सेटवर माझे वडील श्री श्रीराम गवळी आले होते. त्यांच्याबरोबर श्री अरविंद वैद्य जे अनुपमा या सिरीयल मध्ये वडिलांचे भूमिका साकारतात ते पण आले होते आणि सेटवर त्यांची भेट किशोरजी महाबोलें शी झाली, जे अनिरुद्धच्या वडिलांची भूमिका साकारतात, या तिघांचीजी भेट झाली आणि मला असं वाटलं, ही आहे ग्रेट भेट”, असे कॅप्शन मिलिंदने दिले आहे.

आणखी वाचा : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रवीण तरडेंच्या ‘बलोच’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

पुढे मिलिंद म्हणाले, “तिघही अतिशय तरुण ,उत्साही आणि हुशार अनूभवी , माझ्यासाठी हा कालचा दिवस खूप आनंददायी आणि छान गेला, खूप गप्पा झाल्या ,जेवणं झाली ,परत चहा झाले , सहकलाकार यांच्या भेटी झाल्या, अरविंदजीं ना संजना चे कॅरेक्टर खूप आवडतं, त्यामुळे त्यांच्या रुपालीशी खूप गप्पा झाल्या आणि त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले, शंतनु मोघेचे वडील श्रीकांत जी मोघे हे अरविंदजीं चे मित्र होते, त्यामुळे शांतनुची भेट झाली, त्याला त्यांनी आशीर्वाद दिले, सुलभा देशपांडे यांची आठवण काढली आणि त्यांचा चिरंजीव निनाद देशपांडे तोही काल शूटिंग करत होता, त्याची भेट झाली, मग अश्विनी महांगडे, गौरी कुलकर्णी ,अभिषेक देशमुख ,निरंजन कुलकर्णी ,सगळ्यांशी छान गप्पा झाल्या.”

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

पुढे या विषयी आणखी सांगताना मिलिंद म्हणाले, “काल मला तो दिवस आठवला तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझा हात धरून गोविंद सरया यांच्या चित्रपटाच्या सेटवर माझे वडिल मला घेऊन गेले होते ,सिनेमाचं नाव होतं “वक्त से पहले “ खूप घाबरलो होतो, एक्टिंग, सिनेमा काय असतं काहीच माहिती नवतं, ( still I’m unaware) माझ्या वडिलांनी त्यांचे पोलिस खातं जीथे, खूप खडतर प्रवास आहे त्या मार्गावर मला न पाठवता ,या चंदेरी दुनियेचा मार्ग त्यांनी मला दाखवला, वेगळंच विश्व होतं, या विश्वाची त्यांनाही कल्पना नव्हती पण पोलिस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची त्यांना खात्री होती, माझी आवड बघून त्यांनी मला साथ दिली, मला ते नेहमी म्हणत आलेले आहेत ‘काळजी करू नकोस मी आहे’ आणि खरंच ते आहेत म्हणून मी आहे, होतो आणि राहणार. माझे पप्पा आणि अरविंदजी ८० प्लस आहेत पण कुठल्याही तरुण मुलाला लाजवतील इतका उत्साह त्यांच्यात आहे.”