छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यात अरुंधती आणि अनिरुद्ध हे विभक्त झाले आहेत. तर आता अरुंधतीच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आशुतोष केळकर याची एण्ट्री झाली आहे. तेव्हा पासून अरुंधतीच्या आयुष्यात काहीना काही सुरु असल्याचे दिसते.
आता आशुतोष अरुंधतीला गायिका म्हणून लॉंच करणार आहे. त्याची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली होती. त्या जाहिराती विषयी कळल्यानंतर आशुतोषची कशी प्रतिक्रिया असते ते दाखवण्यात आलं आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अप्पा हॉलमध्ये वर्तमानपत्र घेऊन येतात आणि अरुंधतीला तिच्या फोटोविषयी सांगतात.
आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : अमिताभ बच्चन आहेत क्रिप्टो किंग, १.६ कोटी रुपयांची गुंतवणुक करत कमावले ११२ कोटी रुपये
हे ऐकल्यानंतर घरातले सगळे खूश होऊन पेपर पाहू लागतात, तेव्हा यश म्हणतो, आई आणि आशुतोषचा पेपरमध्ये फोटो छापून आला आहे. हे ऐकल्यावर मात्र अनिरुद्धच्या चेहऱ्यावरील रंग बदलतो. पुढे यश संपूर्ण बातमी वाचून दाखवत असताना अनिरुद्ध त्याच्या हातातातून वर्तमानपत्र खेचून घेतो आणि चुरगळून फेकतो. हे पाहून अरुंधती मात्र अस्वस्थ होते,तिला वाईट वाटतं खूप. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.