छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अरुंधतीने तर सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आहे, अस म्हणायला हरकत नाही. आता अरुंधतीच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आशुतोषची एण्ट्री झाली. अरुंधतीने आशुतोषसोबत एका अल्बमसाठी गाणं देखील गाणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी अरुंधती आशुतोषसोबत मुंबई बाहेर गेली होती. आता आगामी एपिसोडमध्ये अरुंधती आशुतोषसोबत घरी परत येणार असल्याचे दिसते. यावेळी त्यांना एका अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

अरुंधती आणि आशुतोष ज्या रस्त्यावरून घरी येत असतात, त्या रस्त्यावर टॅंकर उलटल्यामुळे रस्ता बंद झाला असतो. त्यामुळे या दोघांना ती रात्र मुंबईबाहेर काढावी लागणार आहे. हे जेव्हा अनिरुद्धला समजते तेव्हा त्याला अरुंधतीला बोलण्याची संधी मिळते. नेहमीप्रमाणे या वेळीही अनिरुद्ध चुकीचाच अर्थ लावतो आणि अरुंधतीला खूप काही बोलू लागतो.

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

यावेळी तर अनिरुद्ध त्याच्या घरच्यांना अरुंधतीविषयी भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अनघा जेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अनिरुद्ध तिला म्हणतो, “मी जग बघितले आहे. त्यामुळे काही गोष्टी मला कळतात तशा तुम्हाला कळत नाहीत.” या सगळ्या प्रकरणावर कांचन, अभिषेक यांच्यासोबत घरातले इतर सदस्य कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader