छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. घरच्यांता विरोध असताना अरुंधतीने दबाव टाकल्यानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केले आहे. अनिरुद्धशी लग्न केल्यानंतर आता संजनाचं देशमुख कुटुंबात गृहप्रवेश होणार आहे. ते दोघे ही देशमुखांच्या समृद्धी बंगल्याच्या दारासमोर आले आहेत. संजना तिच्यासमोर ठेवलेल माप ओलांडणार तेवढ्यात अनिरुद्धची आई त्यांना रोखते.
त्यानंतर आईला चक्कर आल्याचे पाहून अनिरुद्ध त्याच्या गळ्यात असलेला हार काढून आईकडे धावतो. तर बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत जाता. त्यावेळी घाईत असलेली अरुंधती चुकून ते माप ओलांडते. हे पाहता अनिरुद्धचं लग्न संजनाशी जरी झालं असलं तरी गृहप्रवेश हा मात्र, अरुंधतीचा झाला आहे.
View this post on Instagram
संजनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी झालेल्या वादानंतर अनिरुद्धच्या आईला स्ट्रोक आला आहे. रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अनिरुद्धला आईला डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्याच क्षणी अरुंधती देशमुखांच्या घरात थांबणार असं ठरवते.
आणखी वाचा : सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार, शेहनाजची अवस्था पाहून डोळे पाणावतील
आई परत आल्या की मी त्यांना त्यांच्या आवडीचं करून देणार असं अरुंधती विमलला सांगते. हे ऐकल्यानंतर विमल बोलते त्यासाठी तुम्ही घरात राहायला हवं. आता पुढे काय होणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या समोर आले असताना. अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं. ती इथे राहिली तर घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर केला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार असल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे.
४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये अरुंधती संजनाला चांगलाच दम देणार आहे. सकाळची काम उरकण्यासाठी अरुंधतीची घाई सुरु असताना. ती अनिरुद्धच्या बेडरूम जवळ येते आणि तेवढ्यात अनिरुद्ध देखील दरवाजा उघडतो. अरुंधतीला पाहून संजना तिला टोचून बोलण्याचा प्रयत्न करते आणि बोलते तू मुद्दाम आमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होतीस. संजनाला सडेतोड उत्तर देत अरुंधती बोलते की या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. अप्पांनी हे घर माझ्यानावावर देखील केलं आहे. आता अरुंधती आणि संजना एका घरात एका छता खाली कशा राहणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.