छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अरुंधतीने तर सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आहे, अस म्हणायला हरकत नाही. आता अरुंधतीच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आशुतोषची एण्ट्री झाली आहे. एवढंच काय तर अरुंधती आता पूर्णपणे बदलली आहे. अरुंधती आता साडीमध्ये नाही तर ड्रेसमध्ये दिसणार आहे.
मालिकेत आता आपल्याला अरुंधती साडीत नाही तर पंजाबी ड्रेसमध्ये दिसणार आहे. आजच्या भागात आपण अरुंधतीचे हे बदलते रुप पाहायला मिळणार आहे. अरुंधतीला तिच्या या नव्या रुपात पाहिल्यानंतर आशुतोषतर आश्चर्यचकीत झाला आहे. अरुंधती समोर येताच तो तिच्याकडे एकटक पाहू लागतो. व्हिडीओच्या सुरुवातीला अरुंधती आशुतोषला केक भरवताना दिसते. त्यानंतर अनिरुद्धचा फोन येतो आणि तो विचारतो की अरुंधती आहे का तिथे? त्यावर अंकल आणि आंटी कधीच गेले झोपायला बेडरुममध्ये उत्तर ऐकल्यानंतर अनिरुद्धच्या तळपायाची आग जशी मस्तकी जाते.
आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक
अरुंधती आणि आशुतोष केळकर हे कॉलेजचे मित्र होते. अरुंधतीने आशुतोषसोबत एका अल्बमसाठी गाणं देखील गाणार आहे. दरम्यान, ही मालिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.