छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अरुंधती या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. अरुंधतीचा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. पण आता आपण अरुंधतीला ड्रेसमध्ये पाहिले आहे. तिच्यात अनेक बदल झाले आहेत. या सगळ्यात आता अरुंधतीला तिच्या घरचे आणि तिची मुलं स्विकारणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांसमोर आहेत.
सध्या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धवर आरोप करतो की ती कामाच्या निमित्ताने मित्रासोबत रात्र घालवून आली आहे. त्यावर उत्तर देत अरुंधती बोलते, “आता मी अरुंधती देशमुखही नाही आहे. तर माझ्याशी बोलताना पातळी राखून बोलायचं.” यावर आई अरुंधतीला बोलतात, “पण अरुंधती…. आईंना मध्येच थांबवत अरुंधती बोलते, तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलात. आता मी इथे नाही राहू शकत,” असं म्हणतं अरुंधती घर सोडून निघून जाते.
आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral
आणखी वाचा : राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम!
सरळसाधी अरुंधती आता बदलली आहे. अगोदर कायम साडीमध्ये दिसणारी अरुंधती आता पंजाबी ड्रेसमध्ये आपल्याला दिसणार आहे. दरम्यान, तिला ड्रेसमध्ये पाहून आशुतोष मात्र आवाक झाला आहे. अरुंधती आणि आशुतोष केळकर हे कॉलेजचे मित्र होते. अरुंधतीने आशुतोषसोबत एका अल्बमसाठी गाणं देखील गायलं आहे. आता मालिकेत पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.