‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत आपल्याला सतत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळतात. संजनानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण देवाच्या कृपेणे ती वाचली. त्यानंतर यश आणि गौरीत दुरावा आला. त्यांच्यात असलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न अरुंधती करत असल्याचे आपण पाहिले. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अरुंधतीला आता चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली आहे. सगळं नीट होत असताना अचानक अरुंधतीच्या आयुष्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे.

मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष आणि नितीन घरी जात असताना त्यांचा अपघात होतो. त्यांच्या गाडीसमोर एक व्यक्ती येतो आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आशुतोष आणि नितीनचा अपघात होतो. गाडी भिंतीवर आपटते आणि आशुतोष कारबाहेर फेकला जातो. या विषयी जेव्हा अरुंधतीला कळते तेव्हा तिला धक्काच बसत

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

आणखी वाचा : स्वप्नात वारंवार साप दिसणे काय सूचित करते, जाणून घ्या

आशुतोषच्या अपघाताची बातमी मिळताच अरुंधती, आप्पा आणि यश हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. तिथे नितीन सगळा प्रसंग सांगतो. आशुतोषला खूप लागलं असून तो आयसीयूमध्ये आहे असे सांगतो. अरुंधती मात्र ठामपणे म्हणते, आशुतोषला काहीही होणार नाही. त्याच वेळी तिला आपलंही आशुतोषवर प्रेम असल्याची जाणीव होते. २६ वर्ष आशुतोष अरुंधतीवरच्या प्रेमापोटी सिंगल राहिला. आता तो बरा होऊन, आशुतोष आणि अरुंधती जवळ येणार का असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे.