छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अरुंधती हे पात्र तर जसं सगळ्यांना आपलं आपलसं वाटायला लागलं आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या कॉलेजच्या काळातील मित्राची म्हणजेच आशुतोष केळकर याची एण्ट्री झाली.

अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर एक रात्र काढावी लागली. त्यावरून अनिरुद्ध आणि आई थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. हा अपमान सहन न झाल्याने या दोघांना खडे बोल सुनावत स्वाभिमानी अरुंधती देशमुख कुटुंबातून कायमस्वरुपी बाहेर पडते. अरुंधतीने जो निर्णय घेतला आहे, त्याचे मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.

आणखी वाचा : Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री इस्लामच्या वाटेवर, ग्लॅमर विश्व सोडून हिजाब परिधान करण्याचा घेतला निर्णय

मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्या देशमुख कुटुंबाने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय करत घरातून बाहेर काढले त्यांच्यासमोर आशुतोष अरुंधतीवरील प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे यावर अनिरुद्धसह देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच अरुंधती आशुतोषच्या यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader