छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका एक आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील देशमुख कुटुंबही प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अरुंधतीप्रमाणेच मालिकेतील इतर कलाकरांनाही प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी साकारत आहेत. त्यांनी मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मिलिंद गवळी चाहत्यांबरोबर दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेबद्दल एक प्रेक्षक “अशी व्यक्ती असू शकते का?, असा प्रश्न पडतो. मालिका पाहून पात्राची चीड येते”, असे मत व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत मिलिंद गवळी यांनी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा >> मृणालचा ‘सिता रामम्’ पाहून कंगना रणौत भारावली, म्हणाली “ठाकूर साहेब…”

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये “NEWS ‘अनिरुद्ध वेडा झालाय’. लेटेस्ट एपिसोड पाहून प्रेक्षकांना कमेंट आवरेना. आधी संजना आता अनिरूद्ध होतोय ट्रोल. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा एपिसोड पाहून प्रेक्षकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. वर्तमानपत्रात ही बातमी मी वाचली. खूप दिवसांपासून ‘ट्रोलिंग’ हा शब्द ऐकत होतो. मग गुगलवर जाऊन ‘ट्रोलिंग’चा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. पण अनिरुद्धच्या बाबतीत हे ट्रोलिंग नाहीच आहे. खरंच अनिरुद्ध वेडा झालाय. खरंच तो वेड्यासारखा वागतोय”, असं म्हटलं आहे.  

हेही वाचा >> Koffee With Karan 7 : आलिया-रणबीरला बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचा सल्ला, म्हणाली “लग्नानंतर फक्त सेक्स आणि…”

पुढे ते पोस्टमध्ये म्हणतात, “मला स्वतःला त्याचं खूप वाईट वाटतं. मीच अनिरुद्ध असल्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं. पण अनिरुद्धच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तोही वेड्यासारखाच वागला असता. वर्षानुवर्ष कर्ता पुरुष म्हणून एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारा माणूस अचानक बेकार होतो. दीड वर्ष घरी बसतो. त्याच्यामुळेच चांगला सुखी संसार मोडतो. विक्षिप्त वागायला लागतो. आयुष्यात आलेल्या दोन्ही बायकांना, आई-वडिलांना, मुलांना, त्याच्या चिडक्या, हट्टी, गर्विष्ठ स्वभावामुळे त्रास देतो”.

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

“आता सगळे त्याचा तिरस्कार करायला लागले आहेत. पण मला स्वतःला म्हणजे मिलिंद गवळीला अनिरुद्ध खूप आवडतो. कारण अनिरुद्ध हा अरुंधती, संजना, यश ,आशुतोष, अविनाश, आनीश या सगळ्यांशी कसाही वागला असेल तरी मला स्वतःला त्याने खूप खूप प्रेम दिलं आहे. त्याच्यामुळेच मला प्रेक्षकांचं खूप खूप प्रेम मिळत आहे”, असं म्हणत मिलिंद गवळी यांनी मालिकेतील पात्राविषयी असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali instagram post viral kak