‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका नेहमीच टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर असते. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतीच शेअर केलेली त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मिलिंद यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन आईचे म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील एक भावनिक दृश्य चित्रीत करण्यात आले. या दृशामध्ये मिलिंद आणि अर्चना दोघेच होते. दरम्यान या दृशामागील पार्श्वभूमी आणि दृश्य चित्रीत करतानाचा किस्सा शेअर करत मिलिंद गवळी यांनी अर्चना पाटकर आणि किशोर महाबोले यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे मिलिंद यांनी अर्चना पाटकर यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन नात्यावर भाष्यदेखील केले.
मिलिंद गवळी यांची व्हायरल पोस्ट –
“Aai’s Love for her Helpless Son Aniruddha”
एकेकाळी कर्तृत्ववान अनिरुद्ध आता फारच असह्य झाला आहे. त्याची व्यथा तो सतत मांडत असतो. अरूंधतीला यश मिळालं आहे, ती खूप पुढे निघून गेली आहे. म्हणून त्याला त्रास होतो, असं जे सगळ्यांना वाटतं तसं नाहीये. अमिताभ बच्चन-जया भादुरीच्या “अभिमान” सिनेमासारखं नाही आहे असं तो म्हणतोय. हे सगळं तो जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्याची आई सोडल्यास, म्हणजेच कांचन आई सोडल्यास दुसरा कोणाचाही त्याच्यावर आता भरोसा, विश्वास राहिलेला नाहीये. शेवटी कांचन आई ती बिचारी आई आहे. तीच आपल्या मुलाला आधार देणार, आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते. मग ती अनिरुद्धची आई असली तरी शेवटी ती आईच आहे.
@archanapatkar10 अर्चनाताई पाटकर यांनी हा सीन खूप छान केला, emotional scenes त्या खरच खूपच छान करतात. scene सुरू व्हायच्या आधी त्या मिश्किलपणे हसत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला की, चटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येत, त्यांचे डोळे भरून येतात. आवाजात एक वेगळाच कंप निर्माण होतो. समोरच्याच्या काळजाला जाऊन तो असा भिडतो की, समोरच्या कलाकारांचे ही डोळे भरून येतात.
या scene मध्ये त्यांच्याकडे पाहिलं आणि माझेही डोळे भरून आले. Love You ArchuTai @archanapatkar10
अभिनेते मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.