छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. त्यात संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचे तर लाखो चाहते आहेत. रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच रुपालीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपालीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रुपाली ठसकबाज लावणी करताना दिसते. स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. रुपाली तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. स्टार प्रवाह ‘धुमधडाका’ २ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पहायला मिळेल.

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

रुपाली ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यासोबत रुपालीने सुमीत राघवनसोबत ‘बडी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतही काम केले आहे. यासोबतच रुपाली ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosle aka sanjana new year dance video went viral dcp