छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत नेहमीच आपल्याला वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळतात. आता आणखी एक ट्वीट पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध विभक्त झाल्यानंतर प्रेक्षकांना एक धक्काच बसला होता. त्यानंतर आता देशमुख कुटुंबातील सगळ्यात लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे गौरी आणि यशमध्ये दुरावा येणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

अरुंधतीचा मुलगा यश आणि त्याची होणारी पत्नी गौरी ही सगळ्यांची आवडत जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच गौरी आणि यशचा साखरपुडा झाला. पण आता गौरी आणि यशमध्ये दुरावा निर्माण होणार आहे. गौरीला कामानिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी मिळणार आहे. आता गौरी यशला सोडून अमेरिकेला जाणार का? यश गौरीला पाठिंबा देणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

आणखी वाचा : प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून बहिण अरुणाताई झाल्या भावूक!

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

मालिकेत आपण पाहिले की गौरी एका फॅशन स्पर्धेसाठी तिचे काही डिझाइन पाठवते. या स्पर्धेसाठी देशातील २५ मुलांची निवड करण्यात आली. या मुलांना नामांकित डिझायनरकडे शिकण्याची आणि काम करण्याची संधी मिळणार आहे. पण यासाठी गौरीला जवळपास २ वर्षे अमेरिकेला जावे लागणार आहे. आता गौरी करिअर निवडणार की प्रेम हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आणखी वाचा : ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होताच प्राजक्ता माळीने शेअर केली ही खास पोस्ट, म्हणाली…

गौरी आणि यश यांच्या आयुष्यात अचानक हा बदल होत असल्यानं त्यांना ते कसे सामोरे जाणार, या बदलामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येणार की ते समजूतदारपणं हा बदल स्वीकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Story img Loader