‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अरुंधती आणि संजनामध्ये सतत वाद सुरु असतात. एका बाजुला अरुंधती तिच्या हक्कासाठी लढत असते. तर दुसरीकडे संजना अनिरुद्धवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण पाहतो. मालिकेत या दोघी जरी एकमेकांच्या विरुद्ध असल्या तरी देखील खऱ्या आयुष्यात या बहिणींसारख्या राहतात. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संजनाने अरुंधतीसाठी चक्क आईच्या हातची स्पेशल बिर्याणी आणली होती. त्या दोघी एकाच प्लेटमध्ये बिर्याणी खातानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या दोघींना एकत्र एकाच प्लेटमध्ये खाताना पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

मालिकेत मधुरीणी गोखले अरूंधतीची भूमिका साकरत आहे. तर संजनाची नकारात्म भूमिका रूपाली चव्हाण साकारते. दरम्यान, आता मालिकेत अरुंधतीच्या मित्राची एण्ट्री झाली आहे. त्याची स्वतःची म्युझिक कंपनी आहे. एवढचं काय तर त्याने अरुंधतीला गाण्याच्या अल्बमची ऑफर दिली आहे. पुढे अरुंधतिच्या आयुष्यात सुख येणार का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

Story img Loader