छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मधुराणी गोखले हिने काल तिचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. मधुराणी गोखलेच्या वाढदिवसानिमित्त रुपालीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रुपालीने इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतचे काही फोटो खास पोस्ट केले आहे. हे फोटो शेअर करत त्याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

मधुराणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ती म्हणाली, “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा आजचा दिवस आणि येणारे वर्ष तुला खूप खूप छान जावो. तुला खरंच खूप खूप प्रेम आणि घट्ट मिठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”. दरम्यान तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरत आहे.

मधुराणी गोखले आणि रूपाली भोसले या दोघीही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमध्ये अरुंधती आणि संजना या एकमेकींशी कठोर वागत असतात. पण पडद्यामागे मात्र त्या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

Video : ‘झुंड’ चित्रपटातील टीम नेमकी कशी तयार झाली? नागराज मंजुळेंनी सांगितला पडद्यामागचा संपूर्ण किस्सा

दरम्यान सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अरुंधती ही स्वत:च्या हिमतीवर भाड्याच्या नवीन घरात राहायला गेली आहे. अरुंधतीचा नवा गाण्याचा अल्बम, आशुतोषची मदत यामुळे अरुंधती यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. तर दुसरीकडे संजना अरुंधतीने घरावरचा हक्क सोडला हे पाहून आनंदात असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte sanjana fame rupali bhosale special birthday wish to madhurani gokhale nrp