छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटानंतर मालिकेत अनेक बदल झाले. कुठे तरी अरुंधती तिच्या आयुष्यात पुढे जात असताना संजना तिला खेचण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यात आता संजनाचा पूर्वाश्रमीचा पतीची एण्ट्री होणार आहे.
अरुंधतीला घटस्फोट दिल्यानंतर अनिरुद्ध आणि संजनाचा संसार सुरु झाला. अरुंधतीचा पूर्वाश्रमीचा पती शेखरची एण्ट्री होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात मालिकेचा प्रोमो दिसत आहे.
आणखी वाचा : “किती पैसे दिले”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यामुळे कपिल शर्मा झाला ट्रोल
या प्रोमोत शेखरची रिएण्ट्री दाखवली आहे. त्यानंतर शेखर सतत संजना आणि अनिरुद्धला टोमणे मारताना दिसतो. शेखरच्या रिएण्ट्रीमुळे संजना घाबरल्याचे दिसत आहे. तो पुढे काय करणार असे अनेक प्रश्न फक्त संजनाला नाही तर प्रेक्षकांना पडले आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे.