स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमध्ये संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका साकारणारा शेखर तुम्हाला माहितच असेल. अभिनेता मयुर खांडगे (Mayur Khandge) ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे मयुर घराघरांत पोहोचला. आता त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – मराठीमधील सगळ्यात बोल्ड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा ‘टकाटक २’चा ‘हा’ नवा व्हिडीओ

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

मयुरला ‘आई कुठे काय करते’मधील शेखर या पात्राने नवी ओळख दिली. आता तो मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाचं पोस्टर, गाणं, ट्रेलर शेअर करत याबाबत माहिती दिली. ‘हबड्डी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मयुर या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये काम करताना दिसेल.

चित्रपटाचं पोस्टर शेअर करत मयुरने म्हटलं की, “प्रतिक्षा संपली. १८ जुलैला ‘हबड्डी’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जवळपास आम्ही सगळ्यांनी ५ वर्ष या दिवसाची वाट पाहिली आणि अखेरीस तो दिवस आला आहे. ते म्हणतात ना बराच काळ वाट पाहिली की त्याचं चांगलं फळ मिळतंच. असंच काहीसं आता घडलं आहे.” मयुरचा हा चित्रपट तब्बल ५ वर्षांनी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

पण रुपेरी पडद्यावर नव्हे तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कबड्डीचा सामना खेळण्यासाठी सज्ज असलेली मुलं दिसत आहेत. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अडखळत बोलणाऱ्या मुलाची झलक पाहायला मिळत आहे. बालकलाकारांचा हा चित्रपट आहे असं चित्रपटाच्या ट्रेलरवरुन दिसत आहे. तसेच डान्सर रुपेश बने या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.