छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला घराघरात एक वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे. नुकतंच अरुंधतीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या लेकीसोबत केलेल्या धाडसाबद्दलची एक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आणि तिची मुलगी दिसत आहे. यावेळीत्या दोघीही काही तरी एखादे धाडसी खेळ खेळताना दिसत आहे. त्यावरुनच मधुराणीने एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
mamta kulkarni is single says left vicky goswami
प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…

मधुराणी प्रभूलकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“साहस ….धाडस
हे शब्द एका वयानंतर अनेकांच्या आयुष्यात केवळ काही निर्णयांपुरते सीमित राहतात… अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो… त्यातला थरार अनुभवणं सोडून देतो… स्वतः ला चौकटीत अडकवून घेतो.

खरेखुरे धाडसी खेळ खेळून मलाही काळ लोटला होता…केवळ मुलीला साथ द्यायची म्हणून मी करायचं ठरवलं… ‘मुलांचंच आहे …. सोप्पं असेल आपण अस्स करू’ ह्या भ्रमात मी होते . एकेक challenging पायऱ्या पार करत करत तो टॉवर वरपर्यंत आम्हाला चढायचा होता.

एखाद्या पायरीवर दोरीला बांधलेले , हवेत तरंगणारे लाकडाचे ब्लॉक्स होते … एका पायरीवर लटकणारे टायर्स होते … कुठे लाकडी लटकणारे बोगदे होते ज्यातून रांगत जायचं होतं… एकंदरीत ह्यातलं मी कधीच काही केलं नव्हतं

माझे पाहिल्याच पायरीवर त्राण गेले…. अशक्य वाटायला लागलं….मी मागे फिरायचं ठरवत होते ..मी घाबरले तशी स्वरालीपण मागे फिरायला लागली , मला हे असं व्हायला नको होतं … मी तिच्यासाठी करत होते, मी घाबरले तर ती हे कधीच करणार नाही ….

होतं न्हवतं ते सगळं धैर्य एकवटून मी ती पहिली स्टेप पार केली तशी मला बघून स्वरालीनी पण पार केली ….पुढचं करायचा धीर आला…. तरी प्रत्येक वळणावर’ हे आपल्याला नाहीच जमणार ‘ असं वाटतच होतं… तरी आमचा trainer मनोहर खूपच बळ देत होता… एकेक करत पुढे पुढे जात राहिलो आता मागे वळण्याचा स्कोप नव्हता समोर येईल ते पार करणं भागच होतं…आम्ही दोघी जेव्हा वर पोहचलो तेव्हा मला अक्षरशः रडायला येत होतं….

आपल्या आतलं , आपल्यालाच मागे खेचणारं काहीतरी आपण पार केलं अश्या जणीवेनी थरथरायला होत होतं…करून बघितल्याशिवाय कळतच नाही नं आपण काय करू शकतो”, असे मधुराणीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मधुराणी प्रभूलकर याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहे. तिने हे धाडसी खेळ खेळल्यानंतर अनेकांनी तिचे त्याबद्दल कौतुकही केले आहे.

Story img Loader