छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या ही मालिका वेगळ्या वळणारवर आहे. अरुंधती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. आता लवकरच तिचा अल्बम देखील लॉन्च होणार आहे. अरुंधतीचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. या सगळ्यात आशुतोषने संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता या सगळ्यानंतर पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
आशुतोषने सगळ्यांसमोर अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला. त्यावेळी तिथे आई, संजना, अनिरुद्ध, अनघा, अविनाश आणि अभिषेक उपस्थित होते. तर ज्या व्यक्तीला अरुंधती मित्र मानते अशा व्यक्तीच्या मनात तिच्यासाठी प्रेम भावना आहेत हे कळल्यानंतर तिला देखील धक्का बसतो. आशुतोश अरुंधतीला भेटून सांगतो, “मी तुला विसरू शकेल असे मला वाटतं होते. पण माझ्या मनात तू जशी होतीस तशीच आजही आहेस. यासोबतच त्याला अरुंधतीकडून कोणत्याही अपेक्षा नाही असे देखील सांगतो. तर ती जो निर्णय घेईल तो त्याला मान्य असेल असं आशुतोष अरुंधतीला सांगतो.”
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
अरुंधती आशुतोष बोलते की “तिने आजवर फक्त अनिरुद्धवर प्रेम केलं आहे. मात्र, असं जरी असलं तरी सुद्धा मी तुझ्यसोबत एक मैत्रिण म्हणून राहीन. तुझ्यासोबत काम करण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही असं अरुंधती आशुतोषला सांगते. यावर आशुतोष तिला सांगतो, जगात अनेक लोकांना आपली मैत्री खटकणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनात स्पष्टता आहे. तोपर्यंत आपण यातल्या कोणत्याच गोष्टीची पर्वा करण्याची गरज नाही.”
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?
पुढे जेव्हा आप्पांना हे सगळं कळतं तेव्हा ते कांचनला बोलतात, “मी असतो तर त्याला म्हणालो असतो. मी माझ्या मुलीला समजावतो. तू तिच्याशी लग्न कर. आप्पांचे हे बोल ऐकल्यानंतर कांचनला मात्र मोठा धक्का बसतो. आता आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाने मालिकेचा शेवट होणार का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.”