छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या विविध ट्विस्टमुळे या मालिकेला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. नुकतंच या मालिकेच्या ट्रोलिंगवर मालिकेच्या सवांद लेखिका मुग्धा गोडबोले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘ही मालिका पाहणारे अनेक प्रेक्षक जेव्हा टीका करतात तेव्हा फार वाईट वाटते’, असे मुग्धा गोडबोले म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते या मालिकेला ट्रोल केलं जात आहे. या मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या विविध दृश्यांवर प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले यांना ‘पहाटे उठून दारु पिऊन मालिका लिहिता का? असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर आणि ट्रोलिंगवर मुग्धा गोडबोले यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी यावर उत्तर दिले आहे.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Father daughter love vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे” VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी
Anis Ahmed Bhai Rebellion Candidacy Congress print politics news
आपटीबार: ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

मुग्धा गोडबोले नेमकं काय म्हणाल्या?

“आई कुठे काय करते? ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे. या मालिकेचे काही भाग मी बघितले. त्यानतंर लेखनातून एक एक पात्र पुढे आलं. सुरुवातीला ही मालिका पाहिल्यावर अनेकांनी विशेषत: महिलांनी छान प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी माझ्या लेखनाचे कौतुकही झाले होते. खरं तर या मालिकेचा विषय खूप वेगळा होता. कारण सुरुवातीला जेव्हा या मालिकेबाबत विचारण्यात आले, तेव्हा याबाबत काय लिहायचं असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला होता. ही संपूर्ण मालिका चाळीशी ओलांडलेल्या एका स्त्रीवर आधारित होती. त्यामुळे या मालिकेत विनोदी किंवा मजेशीर प्रसंग नसणार याची खात्री होती, असे त्यांनी म्हटले

“मला स्वतःला एक एपिसोड लिहायला ५ ते ६ तास लागतात. जेव्हा मी २ ते ३ मालिका लिहिते. त्यावेळी माझे दिवसातील १५ तास खर्च होतात. त्यावेळी हे केवळ दोन तासांचे काम नसून यात तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागतो. पण तरीसुद्धा अनेक लोकांना या क्षेत्रात करिअर करायचं हे ऐकल्यावर मला प्रचंड आनंद होतो”, असे मुग्धा गोडबोले यांनी सांगितले.

या मुलाखतीत मुग्धा गोडबोले यांनी प्रेक्षकांच्या ट्रोलिंगवर देखील भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, “काही प्रेक्षक मालिकेवर अनेकदा टीका करतात. पण एखादी मालिका लिहिणं ही साधी गोष्ट नाही. रोज अर्धा तास प्रेक्षकांसमोर काय आणायचं याचा प्रश्न आम्हाला नेहमीच पडत असतो. प्रेक्षकांसमोर असे मुद्दे मांडणं हे काही सोपं काम नाही.”

‘झुंड’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, सहा दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अरुंधती ही स्वत:च्या हिमतीवर भाड्याच्या नवीन घरात राहायला गेली आहे. अरुंधतीचा नवा गाण्याचा अल्बम, आशुतोषची मदत यामुळे अरुंधती यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. तर दुसरीकडे संजना अरुंधतीने घरावरचा हक्क सोडला हे पाहून आनंदात असल्याचे दिसत आहे.