नागराज मंजुळेंच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’वर बॉलिवुडच्या हस्तींनी कौतुकाचा वर्षाव चालविला आहे. बॉलिवुडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री फँड्रीच्या पेमात पडल्याचे ट्विटरवरील अभिप्रायातून समोर आले आहे.
आतापर्यंत फँड्रीच्या प्रेमात अभिनेते कल्कि कोचलीन, हुमा कुरैशी,दिव्या दत्ता आणि रजत कपूर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील आता ट्विटर आणि फेसबुकवर ‘फँड्री’चा फॅन झाला आहे. त्याने ट्विट केले आहे की, “मी खरोखर एक चालता चित्रपट पाहिला. तो म्हणजे ‘फँड्री’. अप्रतिम सादरीकरण, बिनतोड काम असेच त्याचे वर्णन करावे लागेल. नागराज मंजुळे आणि त्यांची टिम यांना यासाठी श्रेय द्याला हवे. इतकेच नाही तर आमिरने चित्रपटाचा ट्रेलर फेसबुक आणि ट्विटरवरही पोस्ट केला आहे. आमिरने केलेले ट्विटः

 

Story img Loader