विधु विनोद चोप्रांच्या ‘ब्रोकन हॉर्सेस’ या आगामी हॉलिवूडपटाच्या ट्रेलरचे अनावरण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या हस्ते होणार आहे. विधु विनोद चोप्रांचा अत्यंत महत्वकांक्षी चित्रपट म्हणून ‘ब्रोकन हॉर्सेस’कडे पाहिले जाते. एखाद्या भारतीय व्यक्तीने पहिल्यांदाच हॉलिवूडपटाचे लिखाण, दिग्दर्शन आणि निर्मिती करणे हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून, त्यानिमित्ताने अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. ‘ब्रोकन हॉर्सेस’ हा माझ्यासाठी खूप विशेष चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि आमिर खान उपस्थित राहणार असून, मी त्यांचा आभारी आहे. या दोघांच्या उपस्थितीमुळे हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होणार असल्याच्या भावना विधु विनोद चोप्रा यांनी व्यक्त केल्या. या चित्रपटाची कथा अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यानच्या सीमा भागातील गँगवॉरवर आधारित आहे.

Story img Loader