बॉलिवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिरचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमिर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि किरण रावचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर आता तिसरं लग्न अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता यावर फातिमाने प्रतिक्रिया दिली आहे.

आमिर ‘लाल सिंग चढ्ढा’ हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे, असे म्हटले जाते. हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो लग्नाची घोषणा करणार आहे. याच कारण म्हणजे प्रेक्षकांच लक्ष हे त्याच्या लग्नावर असेल आणि चित्रपटावर नाही असे म्हटले जाते.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर आता फातिमाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर आणि तिच्या लग्नाच्या बातम्यांविषयी फातिमाला विचारता ती म्हणाली, “हे सगळं माझ्यासाठी खूप विचित्र आहे. जेव्हा जेव्हा माझी आई हे सगळं टीव्हीवर पाहायची तेव्हा तिला खुप दु:ख होतं होतं. माझा फोटो वर्तमानपत्रात आला की, तिला खूप आनंद व्हायचा, पण जेव्हा ती अशा हेडलाईन वाचते तेव्हा तिला फार वाईट वाटायचं. माझ्याबद्दलच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाही त्रास झाला आहे. त्यानंतर मी विचार केला की आता मला माझे बोलणे सगळ्यांसमोर मांडण्याची गरज आहे.”

आणखी वाचा : “आमच्याबद्दल खोटं पसरवून…”, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपावर अखेर सुनील बर्वेंनी सोडले मौन

दरम्यान, फातिमा आणि आमिरने दंगल आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा पासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्यही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

Story img Loader