आता चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केल्यानंतर आता बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत करीनाने चित्रपट प्रदर्शनाची तारिख सांगितली आहे. “२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. करोनाकाळामुळे झालेल्या या सगळ्या गोष्टीला पाहता, आम्ही या वर्षी नाताळमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला प्रदर्शित करू शकणार नाही. आता आम्ही व्हॅलेंटाईन डे २०२२ मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित करू”, असे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. करीनाने आमिर खान प्रोडक्शनची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे.

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader