बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट नेहमीच काहीतरी वेगळं करताना दिसतो. चित्रपटासाठी आपल्या लूकसोबत वेगवेगळे प्रयोग करायला आमिरला आवडतात. नुकताच आमिरचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा लूक चित्रपटासाठी नसून तो मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी आमिरनं धारण केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिर- किरणचा मुलगा आजाद हा १ डिसेंबरला सहा वर्षांचा होणार आहे. त्याच्यासाठी आमिरनं प्री बर्थडे पार्टी ठेवली होती. पार्टीसाठी आमिरनं ‘एस्टेरिक्स’ ही थिम ठेवली होती. फ्रेंच कॉमिक बुकपासून आमिरनं या थिमची प्रेरणा घेतली होती. पार्टीसाठी आमिरनं खास ओबेलिक्सचा अवतार धारण केला होता. तर किरण गेटाफिक्स द ड्रूअडच्या वेशात आली होती. आमिरचा मुलगा आजाद एस्टेरिक्सच्या वेशात होता.

 

आमिरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजादच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. या पार्टीसाठी आमिरनं आपल्या पाळीव कुत्र्यालादेखील कॉमिक कॅरेक्टरच्या वेशात आणलं होतं. मुलाच्या आनंदात समरस होऊन स्वत: कार्टुनच्या वेशात आलेल्या आमिरचा हाही अंदाज अनेकांना आवडला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan and kiran rao who hosted an asterix themed party for their son azad rao khan
Show comments