भारत हॅबिटेट सेंटरमध्ये शनिवारी `गोल्डन केला पुरस्कार` हा अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा या पुरस्काराचे सहावे वर्ष होते. हा पुरस्कार बॉलिवूडमधील सर्वात वाईट चित्रपट आणि अभिनयासाठी दिला जातो.
`गोल्डन केला पुरस्कार २०१३`च्या पुरस्कार सोहळ्यात सर्वात वाईट अभिनेता म्हणून अजय देवगण आणि वाईट अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आली. अजयला `हिम्मतवाला` आणि सोनाक्षीला `आर… राजकुमार` या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तसेच `हिम्मतवाला` या चित्रपटाला यंदाचा सर्वात वाईट चित्रपट म्हटले गेले आहे. तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला `धूम-३`चित्रपटातील अभिनयासाठी `बावरा हो गया है के` हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वात वाईट सहाय्यक कलाकारचा पुरस्कार आदित्य रॉय कपूरला `ये जवानी है दिवानी` आणि दीपिका पदुकोन, जॅकलीन फर्नांडिस आणि अमिषा पटेल यांना `रेस-२`साठी विभागून देण्यात आला आहे. बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसची आकडेवारी चित्रपट गुणवत्तेशी जुळत नाही. तसेच त्या आकड्यांचा अभिनेत्यांना १० वर्षांनी विसरही पडतो. मात्र `केला पुरस्कार`चा विसर पडूच शकत नाही, असे `गोल्डन केला पुरस्कार`चे प्रमुख अनंत सिंह यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा