आमिर खान बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधला प्रयोगशील आणि यशस्वी अभिनेता म्हणून आमिरची ओळख आहे. आमिरनं ‘गजनी’, ‘दंगल’, ‘थ्री इडियट्स’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आपली ओळख केवळ बॉलिवूडपुरता मर्यादीत न ठेवता त्यानं परदेशी प्रेक्षकांच्या हृदयातही आपलं स्थान मिळवलं मात्र त्याच्या इतकं यश त्याचा भाऊ फैजलच्या पदरात आलं नाही. त्यामुळे फैजल खान बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर गेला पण आता फैजल पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तब्बल १९ वर्षांनंतर फैजल बॉलिवूडमध्ये पार्श्वगायकाच्या रुपात पुनरागमन करणार आहे. ‘फॅक्टरी’ चित्रपटासाठी फैजल पार्श्वगायन करणार आहे. फैजलनं ‘मेला’ चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. या चित्रपटात आमिर खान प्रमुख भूमिकेत होता. फैजल खाननं ‘प्यार का मौसम’ चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर आमिरच्या ‘कयामत से कयामत’ तक चित्रपटात तो छोट्याशा भूमिकेत झळकला. आमिरइतकं यश फैजलच्या वाट्याला आलं नाही त्यामुळे तो बॉलिवूडपासून काही काळापुरता दूर गेला. मात्र आता तो पार्श्वगायकाच्या रुपात बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.