बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची मुलगी इरा हिने पहिल्यांदाच चित्रप्रदर्शनाचे आयोजन केल असून, आमीरनेदेखील मुलीचे कौतूक करीत प्रदर्शनातील एक चित्र विकत घेतले. यावेळी बोलताना आपल्याला मुलीचा अभिमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली. कृष्ण-धवल रंगातील हे चित्र ‘वाघाचे घर’ म्हणून ओळखले जात असल्याची माहिती त्याने दिली. इराने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या प्रदर्शनातून सदर चित्र विकत घेऊ शकल्याबद्दलचा आनंद आमीरने टि्वटरवर व्यक्त केला आहे. इरा आणि जुनेद ही आमीर आणि त्याची पहिली बायको रीना दत्ता यांची मुले आहेत. नंतर आमीरने चित्रपटकर्ती किरण रावशी लग्न केले. त्या दोघांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. सध्या आमीर ‘दंगल’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

Story img Loader