सलमानला आमिरबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. आमिरच्या प्रत्येक गोष्टीचे त्याला कौतुक असते आणि तो जाहीरपणे ते व्यक्तही करतो. आमिरवरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी तो दवडत नाही. त्यामुळे ‘धूम ३’ चित्रपटातील साहिलच्या भूमिकेसाठी आमिरने वापरलेली टोपी घालून सलमान ‘बिग बॉस’मध्ये अवतरला आणि आपल्या मित्रावरचे प्रेम पुन्हा एकदा जाहीर केले.
‘बोलर टोपी’ म्हणून ओळखली जाणारी टोपी आमिरने ‘धूम ३’ साठी वापरली असून ती त्याची ओळख बनली आहे. त्यामुळे चित्रिकरणाला सुरूवात झाल्यानंतर आमिर जिथे जाईल तिथे तीच टोपी घालून फिरत असतो. एवढेच नाही तर ‘धूम ३’ मध्ये वापरलेल्या ज्या ज्या गोष्टींचे मर्केडायझिंग सुरू आहे त्यात आमिरची टोपी खास ‘धूम’ ब्रँडेड म्हणून विकण्यात येत आहे. एवढेच नाही तर आता प्रत्येक कार्यक्रमात आमिर सध्या ही टोपी घालून वावरताना दिसतो आहे. आमिरची ही टोपी लोकप्रिय करण्यासाठी सलमानने आता ती आपल्या डोक्यावर घातली आहे.
सलमानने ‘बिग बॉस’ च्या सेटवर ही टोपी घालून प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांनाच कमाल वाटली. आमिर आणि सलमानच्या मैत्रीचे किस्से सगळ्यांना माहिती असले तरी इतक्या उघडपणे आपली मैत्री व्यक्त करण्याची कमाल फक्त सलमानच करू शकतो. योगायोगाने, सलमानची टोपी ही अशीच लोकप्रिय झाली होती. ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमानने वापरलेली निळ्या रंगाची ‘फ्रेंडशीप’ लिहिलेली टोपीही त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

Story img Loader