याआधी प्रसिद्ध झालेल्या आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाच्या पोस्टरने एकच खळबळ माजवली होती. ज्यात नग्न आमिरने लज्जा झाकण्यापुरता हातात केवळ ट्रान्झिस्टर धरला होता. चित्रपटाच्या या पोस्टरवरून उठलेल्या वादळाला तोंड देताना आमिरला नाकीनऊ आले होते. बुधवारी मुंबईत या बहुचर्चित चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले. या नव्या पोस्टरमध्ये पाढऱ्या पायजम्यावर गुजराती कुर्ता परिधान केलेला आमिर खान नजरेस पडतो. त्याचबरोबर डोळ्यावर काळा गॉगल घातलेल्या आमिरच्या हातातील ‘भैरोसिंह बॅंड’चे वाद्य लक्ष वेधून घेते. या पोस्टरबरोबर तयार करण्यात आलेल्या ‘मोशन पोस्टर’ प्रकारात आमिरने पुन्हा एकदा भोजपुरी भाषेत संवाद साधला आहे.



‘पीके’च्या पहिल्या पोस्टरनंतर टीकेला सामोरा गेलेल्या आमिरने हे दुसरे ‘मोशन पोस्टर’ टि्वटरवर शेअर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘पीके’ चित्रपटाचे निर्माते दर आठवड्याला एक अशी ८ पोस्टर्स प्रदर्शित करणार आहेत.

Story img Loader