आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाचे प्री-व्हेडिंग स्विर्त्झलँड येथे सुरू आहे. अंबानी परिवाराकडून जोरदार या सोहळ्याची तयारी केलेली पाहायला मिळाली. या सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. करण जोहर, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासह अन्य बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. या संगीत सोहळ्यात बॉलिवूड कलाकार ठेका धरताना दिसून आले. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि श्लोका मेहता डान्स करताना दिसून येत आहेत. आमिर खानने ‘आती क्या खंडाला’ या गाण्यावर श्लोका मेहतासोबत ठेका धरला आहे. यावेळी उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
View this post on Instagram
#shlokamehta with #aamirkhan at #akashambani #shlokamehta fairytale pre wedding bash @viralbhayani
अंबानी परिवाराने १० मार्च रोजी मंगल पर्वाचे आणि ११ मार्च रोजी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक दिग्गज हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची ग्रँड वेडिंग सेरेमनी मुंबईतील वर्ल्ड सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती.
View this post on Instagram