बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कामापेक्षा जास्त आयराच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चा होताना दिसते. सध्या ती आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. अनेकदा ती बॉयफ्रेंड नुपूरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळे आयरा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आमिरची लेक आयरा खान मागच्या दोन वर्षांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता आयरानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे आणि आजी जीनत हुसैन यांची भेट घालून दिली. या भेटीचे काही फोटो आयरानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Jeet Adani Diva Shah Marriage
Jeet Adani : विवाहापूर्वी गौतम अदाणींच्या मुलाची ‘मंगल सेवा’, दिव्यांग भगिनींसाठी केली इतक्या लाखांची तरतूद
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
Aai Kuthe Kay Karto Fame Actor Went To North Finland
बॉर्डर क्रॉस केली अन्…; मराठी अभिनेता पत्नीसह ‘असा’ पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया! फोटो एकदा पाहाच…
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर

आजी आणि नुपूरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना आयरानं लिहिलं, “सहजच काढलेले आनंदी फोटो” या फोटोंमध्ये आयरा, नुपूर आणि जीनत हुसैन हसून फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आयराच्या या फोटोंवर चाहत्यांनी धम्माल कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तर तिला ‘लग्न करणार आहेस का?’ असा प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारला आहे. जीनत आणि नुपूर यांच्या भेटीवरून आयरा लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

आणखी वाचा- “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल

दरम्यान नुपूर शिखरे आणि आयरा खाननं मागच्या वर्षीच त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर अनेकदा तिने नुपूरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय आयरानं नुपूरच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी नुपूर आयराच्या कुटुंबासोबत दिसला होता. अगदी अलिकडेच आयरानं त्यांच्या नात्याला २ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती.

Story img Loader