विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या ‘एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमावर बॉलीवूड अभिनेता आमिर खानने संताप व्यक्त केला. ‘एआयबी’च्या व्हिडिओ पाहून निराश झाल्याचे आमिरने मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले. आमिर म्हणाला की, “एआयबी हा अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह असून यामुळे मी अतिशय निराश झालो.”
‘यू टय़ूब चॅनेल’ला सेन्सॉरशिप हवी का?
आमिरने या कार्यक्रमाबाबत करण जोहर आणि अर्जुन कपूरला झापले. करण जोहर आणि अर्जुन कपूर माझे चांगले मित्र आहेत. पण, त्यांनी असे कार्यक्रम करणे मला अजिबात आवडले नाही. या कार्यक्रमातून आपण स्वत: किती आक्षेपार्ह आहोत ते जगाला दाखवण्याचे काम करत आहोत. आपल्यात किती फालतूपणा भरला आहे, हे जगाला दाखवणे योग्य नाही, असे आमिर यावेळी म्हणाला. तसेच या कार्यक्रमाबाबत अनेकांची वेगवेगळी मतं असतील. अनेकांना कार्यक्रम आवडला देखील असेल. ‘एआयबी’च्या व्हिडिओ अद्याप पाहिलेल्या नाही पण, त्याच्या एक-दोन क्लिप्स पाहिल्या असून त्यातील करण आणि इतरांचे संवाद ऐकून धक्काच बसल्याचे यावेळी आमिरने सांगितले.
‘रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करण जोहर यांनी माफी मागितली पाहिजे’
‘क्लिप्स’पाहून हा कार्यक्रम माझ्या धाटणीचा नसल्याने तो संपूर्ण पाहण्याच्या फंदातच मी पडलो नाही. प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य आहे हे मान्य पण, त्यासोबत समाजाप्रती जबाबदाऱया देखील आहेत. याचा विसर पडता कामा नये आणि एक कलाकार म्हणून मला स्वत:ला सामाजिक भान राखायला हवे. जर शिव्या देऊन मी प्रभावित होईल असे तुम्हाला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. शिव्या देऊन प्रभावित होण्याचे माझे वय नाही. मी १४ वर्षांचा असतो तर, प्रभावित झालो असतो, असेही आमिरने यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा