भारतीय माध्यमांमधून बॉलिवूडच्या खान त्रयींचाच उदोउदो केला जात असून, विकास व शिक्षणासारखे अतिमहत्त्वाचे विषय दुर्लक्षीत होत असल्याची नोबेल पारितोषिक विजेत अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांची टीका बॉलिवूडस्टार अमिर खान याने मान्य केली आहे.
“मला असे वाटते डॉ. सेन यांचे म्हणणे बरोबर आहे. मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे,” असे अमिर म्हणाला.
अमर्त्य सेन यांनी भारतीय माध्यमांचा खरमरीत समाचार घेतला होता. बॉलिवूडच्या तीन खानांच्या बातम्या दाखवणाऱ्या माध्यमांजवळ शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर बोलायला वेळ नसल्याची टीका सेन यांनी केली होती.   
अमिर खान, कतरिना कैफ आणि अभिषेक बच्चन २० डिसेंबरला प्रदर्शीत होणाऱ्या ‘धूम ३’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी चेन्नईला आले होते. त्या ठिकाणी अमिरने सेन यांची टीका खरी असल्याची कबूल दिली.    

Story img Loader