बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानला अमेरिकेतल्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सत्यमेव जयते या कार्यक्रमातून सामाजिक समस्यांवरील वादविवाद समोर आणण्यासाठी त्याने केलेल्या यशस्वी प्रयत्नांकरिता हा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला आहे. आमिरसोबत अमेरिकेतील विख्यात निर्माती कैथरीन बिगेलो आणि ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन नॉन वायलेंट कन्फ्लिक्ट’ (आयसीएनसी) हे देखील ‘अमेरिका अब्रॉड मिडीया’ (एएएम) या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पुरस्कार स्वीकारतेवेळी आमिर म्हणाला की, आम्ही भारतात सुरु केलेल्या कामाला देशाबाहेरही प्रशंसा मिळत आहे. मी आणि माझ्या सहका-यांनी हा कार्यक्रम प्रेमाने करण्याचा प्रयत्न केला. कारण, आम्हाला असे वाटते की, आम्हीही त्यांच्या समस्येचाच एक भाग आहोत आणि त्याच्यावरचा उपायही आहोत. दुस-यांवर बोट दाखविण्यापूर्वी आपल्याला स्वतःला आधी प्रश्न विचारण्याची गरज आहे.
हा फार दुर्मिळ क्षण होता. कारण, कित्येक वर्ष झाले आमिर कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही आणि तसेच, तो पुरस्कार स्वीकारतही नाही आहे.

Story img Loader