अभिनेता आमिर खान आणि करिना कपूर यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान करिना कपूरसाठी मध्यप्रदेशची खास चंदेरी साडी विकत घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिना कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा करिना कपूर आणि आमिर खान त्यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचं शूटिंग करत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आमिर करिनासाठी हॅन्डलूम वर्करकडून साडी विकत घेताना दिसत आहे. आमिर त्यांना विचारतो, ‘मी ही साडी विकत घेऊ शकतो का?’ त्यावर हॅन्डलूम वर्कर होकार देतो. तेव्हा आमिर खान म्हणतो, ‘तर मी ही साडी विकत घेणार आहे. करिना कपूरसाठी. हे माझ्याकडून करिनासाठी गिफ्ट असेल.’

याच व्हिडीओमध्ये पुढे आमिर खान त्या वर्करला म्हणतो, ‘मी तुमच्याकडून ही साडी विकत घेईन पण मी तुम्हाला याचे ६ हजार ५०० रुपये देणार नाही. मी तुम्हाला याचे २५ हजार रुपये देईन कारण ही त्या साडीची मार्केट प्राइज आहे. खूप छान डिझाइन आहे.’ आमिरच्या बोलण्यावर तो वर्कर सांगतो की, ही साडी तयार करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला आहे. या व्हिडीओमध्ये करिना साडी ट्राय करताना दिसत आहे.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर आमिर खान आणि करिना कपूर यांचा चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’चं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. दरम्यान करिना आणि आमिर यांचा हा एकत्र काम करत असलेला हा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘3 इडियट’ आणि ‘तलाश’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan gifted special hand work saree to kareena kapoor mrj